भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वाड़मय मंडळाची स्थापना

भुसावळ (27 जून 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात गुरुवार, 26 जून रोजी कालिदास दिनाच्या निमित्ताने वर्षभर राबविण्यात येणार्या वाडमयीन उपक्रमांसाठी वाडमय मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यालयातील उत्स्फूर्त लेखन करणारे, वक्तृत्व, निबंध लेखन तसेच सुलेखन करणार्या विद्यार्थ्यांचा समावेश या मंडळात करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगावा
प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक राहुल भारंबे होते. आपल्या संवादातून विद्यार्थ्यांनी व्यक्त होण्याचा आत्मविश्वास अंगी बाणावा, असे सांगत असा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे वाड़मय मंडळ कार्य करेल व त्यातून विद्यार्थी सक्षम बनतील, असा आशावाद भारंबे यांनी व्यक्त केला. आपल्यातील कला ओळखून त्या जोपासाव्या वाङमयातून आपला सर्वांगीण विकास तर होईलच परंतु स्वनिर्मितीचा मिळणारा आनंद ही निराळाच असेल, असे विविध उदाहरणांच्याद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रास्ताविकात एस.एम.चिपळूणकर यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्यसंपदेचा परिचय करून देताना त्यांच्या वा।मयाची वैशिष्ट्ये सांगितली. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक विकासासाठी दिलेले योगदान तसेच त्यांचा राष्ट्र विकासाचा दृष्टिकोन विषद केला. बालगंधर्वांच्या नाट्य क्षेत्र व संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. आभार एस.पी.महाजन यांनी मानले. विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, शिक्षक एस.पी.पाठक यांचे मार्गदर्शन लाभले
