भुसावळातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी


भुसावळ (28 जून 2025) : भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमध्य लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मेढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी क्रीडा शिक्षक बी.एन.पाटील होते. प्रसंगी शाळेतील सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, डॉ.प्रदीप साखरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज खरेखुरे क्रांतीकारक
बी.एन.पाटील यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सरला सावकारे यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक डॉ.प्रदीप साखरे यांनी राजर्षी शाहू महाराज हे कसे आदर्श राजे होते हे पटवून दिले. शाळेचे शिक्षक एस.टी.चौधरी यांनी विविध उदाहरणांद्वारे शाहू महाराजांच्या कार्याचा धावता आढावा घेतला.









शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मेढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज जनक्रांती करून वाचा फोडणारे एक समाज क्रांतीकारक होते. त्यांनी केवळ विचारांनी नाही तर स्वतःच्या आचरणातून समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून जागोजागी वस्तीगृहे, जागोजागी शाळा काढल्या, गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली, आणि समाजातील जातीयता नष्ट व्हावी म्हणून ते स्वतः दलित लोकांच्या घरी लग्नाला जात असत व त्यांच्या पंक्तीत भोजन करीत असत.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
शाळेतील डी.के.भंगाळे, एन.बी.पाटील, संध्या धांडे, रेखा सोनवणे, शालिनी बनसोडे, प्रवीण चौधरी, पूनम देवकर, मंदा मोरे, लक्ष्मण पवार, अरुण नेटके, राजू बागुल आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार शाळेचे शिक्षक एन.एच..राठोड यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !