पालिका प्रशाससकांना साकडे : भुसावळात पावसाळ्यात अतिक्रमितांवर कारवाई नको

माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील आठवडे बाजारातील जैन मंदिराजवळ अतिक्रमण पालिकेने काढल्यानंतर शहरातील अन्य भागातील अतिक्रमण पावसाळ्यात काढू ये, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे.

सानप यांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्र क्र.संकिर्ण 2021/प्र.क्र.2008/नवि-20 दिनांक 29 जून 2021 या पत्रान्वये 1 जून पासून ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी पावसाळ्यात अनधिकृत झोपड्या किंवा अनधिकृत बांधकाम काढू नये, असे नमुद असतांना सदरील अतिक्रमण भुसावळ मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी काढलेआहे.









पालिकेने या अतिक्रमणासह अन्य अतिक्रमण काढू नये अशी विनंती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केली आहे. ही कारवाई न थांबल्यास आपल्या विरूध्द उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल व होणार्‍या परिणामास आपण जबाबदार रहाला असा इशारा सानप यांनी दिला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !