भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिंडी सोहळ्याने वेधले लक्ष

Dindi ceremony attracts attention at N.K. Narkhede English Medium School in Bhusawal भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील शारदा नगरातील एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शनिवार, 5 रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीने लक्ष वेधले तर विठ्ठल व रुख्मिणीची विद्यार्थ्यांनी सजीव भूमिका वठवली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे सेंकेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. संस्थेचे ऑनररी जॉईंट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते शाळेत विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन करण्यात आले. शालेय परीसरातील आवारात दिडी सोंहळा काढण्यात आला. दिंडीचे स्वागत व पूजन केल्यानंतर पालखीचे दर्शन घेण्यात आले.

विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषभूषा
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारली. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा साकारली तर टाळांच्या जयघोषात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर आधारीत भक्तीगीते गायीली तसेच आषाढी एकादशीनिमित्त माहिती सांगितली. शाळेचे आणि शाळेच्या परीसरातील वातावरण भक्तीमय व उल्हासीत झाले. या उपक्रमात नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिक्षिका तनुजा चौधरी यानी विठ्ठलाचे अभंग म्हणून वातावरण उत्साहित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ मकरंद एन. नारखेडे, संस्थेतील सर्व सभासदातर्फे आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या.शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
