जंगली रमी पे आवो ना महाराज ! माणिकराव कोकाटेंच्या ‘जुगार शेती’ने सरकार अडचणीत !


Jangli Rummy Pay Awo Na Maharaj मुंबई (20 जुलै 2025) : राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अलीकडेच एका वादग्रस्त प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली. हे कमी काय आता ते विधानसभा अधिवेशनात चक्क रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठली आहे. याबाबतचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येतात.

काय आहेत रोहित पवारांची पोस्ट
रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली ‘रमी पे आओ ना महाराज !’ सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.




कधीतरी शेतीवर या महाराज
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांची कभी गरीब किसानो की खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

कोकाटे यांच्या स्पष्टीकरणाबाबत दोन भूमिका
स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनीही दोन थेरी मांडल्या आहेत. पहिल्या थेरीत ते म्हणाले, वरच्या हाऊसला बिझनेस असल्यामुळे मी वर बसलो होतो आणि हाऊस अडजर्न झाले असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता. मोबाईल ओपन केल्यानंतर युट्यूबवर येत असताना अशा प्रकारच्या अनेक जाहिराती या ठिकाणी येतात. आता त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या मी स्किप करत होतो. ती जाहिरात स्कीप करण्यासाठी मला दोन-तीन सेकंद लागले. त्यांनी व्हिडिटो 18 च सेकंदांचा दाखवला आहे. त्यांनी आणखी पुढे दाखवला असता तर स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही.

दुसर्‍या थेरीत ते म्हणाले, मी रमी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट. मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललं आहे? ते पाहण्यासाठी युट्यूब ऑन करायचे म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुणीतरी गेम डाउनलोड केला होता. तो गेम मी स्किप करत होतो. स्किप करत असताना तेवढ्या वेळा तो व्हिडिओ आला असेल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !