काशी एक्स्प्रेसमध्ये तोतया ‘टीसी’ ला यंत्रणेकडून बेड्या


Impersonator ‘TC’ arrested by authorities in Kashi Express भुसावळ (20 जुलै 2025) : महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रेल्वे गाड्यांमध्ये शिस्तबद्धतेसाठी भुसावळ विभागात कार्यरत असलेल्या विशेष दामिनी पथकाने शुक्रवारी मुंबईकडे जात असलेल्या अप काशी एक्सप्रेसमध्ये तपासणीदरम्यान या पथकाने एक बनावट तिकीट निरीक्षकाला पकडले. आरोपीला मनमाड रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविण्यात आले. ही कारवाई शुक्रवार, 18 रोजी भुसावळ ते मनमाड या रेल्वेखंडामध्ये करण्यात आली.

संशय येताच पकडले
नेहमीप्रमाणे दामिनी पथक तपासणी कार्य करीत असताना एक संशयित व्यक्ती रेल्वेच्या गणवेशात प्रवाशांची तिकीट तपासणी करताना आढळला. चौकशीदरम्यान तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही व त्याच्याकडे कोणतेही वैध रेल्वे ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्र नव्हते. यामुळे दामिनी पथकाने तत्परता दाखवत त्या व्यक्तीस त्वरित ताब्यात घेतले आणि मनमाड स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले.




रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना विनंती करते की, गाडीत किंवा स्टेशन परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित रेल्वे कर्मचार्‍यांना, रेल्वे सुरक्षा दलास किंवा हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !