राज्य मंत्रिमंडळात लवकर फेरबदल ! : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Deputy Chief Minister Eknath Shinde पंढरपूर (25 जुलै 2025) : राज्याच्या मंत्री मंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताच विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पंढरपूरात केले भाष्य
पंढरपूर येथे एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या नावे पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. पद खाली वर होत असतात, असे म्हणत त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे.






पुढे बोलताना ते म्हणाले, चांगले काम करण्याचा सरकारचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही, खुर्चीत ज्यांनी बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सारे एकत्र आहोत, असे शिंदे यांनी म्हटले.

पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत येत आहे का? असा सवाल केला. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, असे काहीही नाही. एसटी महामंडळाने एकत्र बूकिंगवर 30 टक्के वाढ केली होती. त्याबद्दल मी सकाळीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोललो आहे. त्यांनी जी काही वाढ केली आहे ती रद्द करण्यास सांगितले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !