आमदार खडसेंचे खुले चॅलेंज : ..तर राजकारणातून निवृत्ती !
जळगावात भाजपा आमदारांच्या पत्रकार परिषदेत आमदार खडसेंची मोठी घोषणा
MLA Mangesh Chavan जळगाव (26 जुलै 2025) “ राज्यात गाजत असलेल्या प्रफुल्ल लोढा प्रकरणात आरोपांच्या फैरी झडत असताना काल जळगावात सत्ताधारी आमदारांनी आमदार खडसेंवर टीकेचे बाण चालवले होते तर त्यास शनिवार, 26 रोजी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी माझ्या आपल्या विरोधातील एक तरी पुरावा दिला तर मी राजकारणातून सन्यास घेईल, असे आव्हानच आमदार खडसे यांनी देत खळबळ उडवून दिली आहे.
‘त्या’ आमदारांना मीच घडवले….!
मला आनंद वाटला असता ही पत्रकार परिषद शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी विषयी झाली असती तर, परंतु ही पत्रकार परिषद नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठी आमदारांना आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली, त्यांना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली? त्यांची मजबुरी मी समजू शकतो. मला या आमदारांवर फार काही बोलायचं नाही, कारण आता जे आमदार आहेत, त्यांना मीच घडवलेलं आहे, असा टोला यावेळी एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.





