शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या
Former trustee of Shani Shingnapur Sansthan, Nitin Shete, commits suicide अहिल्यानगर (28 जुलै 2025) : शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचार्यांना काढण्यात आले होते. त्यानंतर देवस्थानचे बनावट पास तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.





