चार पोलिस निरीक्षकांना ‘एका दिवसाची पदोन्नती‘
Four police inspectors get ‘one-day promotion’ नांदेड (30 जुलै 2025) : मंगळवारी चार पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश सायंकाळी जारी करण्यात आले. हे पोलिस निरीक्षक बुधवारी पोलिस उपअधीक्षक पदावर रुजू झाले असून गुरुवारी सायंकाळी सेवानिवृत्त होत आहेत.
पोलिस अधिकार्यांना सेवानिवृत्तीच्या काही तासांपूर्वी पदोन्नती देण्याची पोलिस महासंचालक कार्यालयाची परंपरा जुलै महिन्यातही कायम आहे.





पदोन्नती मिळालेले चारपैकी तीन पोलिस निरीक्षक हे बृहन्मुंबईचे आहेत. त्यामध्ये जीवन खरात, दयानंद नायक, दीपक दळवी यांचा समावेश आहे. त्यांना त्याच शहरात उपअधीक्षक पदावर नियुक्ती दिली गेली आहे तर पांडुरंग पवार हे जळगावचे असून त्यांना तेथेच आर्थिक गुन्हे शाखेत नेमले गेले आहे
‘औटघटके’ची पदोन्नती देण्याच्या महासंचालक कार्यालयाच्या परंपरेवर पोलिस वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळतो. जून महिन्यातही अशाच पद्धतीने सेवानिवृत्ती तोंडावर आलेल्या पोलिस निरीक्षकांना 27 तारखेला पदोन्नती दिली गेली होती. जुलैमध्ये आणखी दोन दिवस पुढे जात 29 तारखेचा मुहूर्त साधला गेला. अवघ्या 48 तासांसाठी चार पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलिस उपअधीक्षक बनविले गेले आहे.
