साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याने हाणामारी : गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू


Fight over not being invited to engagement party : Seriously injured man dies during treatment यावल (31 जुलै 2025) : यावल शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना मारहाण केली. यातील एक जण हा गंभीर झाला होता. या जखमीचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात खुनाच्या कलमेत वाढ करण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जात आहे.

असे आहे प्रकरण
शहरात बोरावल गेट भाग आहे. या भागातील रहिवासी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुडा कोरपावली, ता.यावल येथे पार पडला. तर या साखरपुड्याच्या कार्यक्रमात आमत्रंण दिले नाही या कारणावरून सोमवार, 2 रोजी रात्री आरीफ नजीर पटेल (43) यांना सशंयीत आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल,अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाकडी लाठया -काठयानी त्यांच्या घरात बळजबरीने घुसून त्यांना डोक्यावर वार करीत जबर दुखापत केली होती. व एका महीलेचा विनयभंग केला होता. या हाणामारीत सदर कुटुंबातील महिला पुरूष असे पाच जण जखमी झाले होते.

गंभीर जखमी तथा कोमात गेलेल्या आरीफ पटेल या 43 वर्षीय इसमाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा या गुन्ह्यात आता कलमांमध्ये खुनाची कलम वाढणार आहे. मयत इसमावर यावल ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक वाढवे करीत आहे.

किरकोळ वाद कुटुंब उघड्यावर
किरकोळ स्वरूपातील या वादात आरीफ पटेल यांना जबर मारहाण करण्यात आली होती व गेल्या 60 दिवासांपासुन त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते कोमा मध्ये गेले होते असे असतांना कुटुंब, नातलगांची त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्याने संपूर्ण कुटुंबचं उघड्यावर आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !