तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली : राज्यातील या अधिकार्यांच्या बदल्या
Tukaram Mundhe transferred again: Transfers of these officers in the state मुंबई (5 ऑगस्ट 2025) : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकार्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या





तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) : विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नितीन काशीनाथ पाटील (आयएएस : एससीएस : 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अभय महाजन (आयएएस : नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ओंकार पवार (आयएएस : आरआर : 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आशा अफजल खान पठाण (सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर) यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांची 20 वर्षात 23 वी बदली
प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधार्यांना पसंत नाही.
तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 23 वी बदली ठरली आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येतंय.
तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या प्रशासनाला, कर्मचार्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयात उशीरा येणार्या कर्मचार्यांना त्याचा फटका बसतो तसेच कार्यालयातील लाल फितीचा कारभार संपवण्यावर मुंढे यांचा भर असतो. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काम करतात.
