भोंदूगिरीद्वारे 400 ग्रॅम सोन्याची विक्री : हुपरी परिसरातून आरोपीला बेड्या


Selling 400 grams of gold through fraud : Accused arrested from Hupari area हुपरी (5 ऑगस्ट 2025) : भोंदूगिरी करून चारशे ग्रॅम सोन्याची विक्री केल्याप्रकरणी पोलिस पथकाने विविध ज्वेलर्स व व्यापारी वर्गाकडून तब्बल 35 तोळे सोने व डॉक्टर नामक व्यक्तींकडून पाच लाख रुपये हस्तगत केले. पनवेल पोलीस पथकाने हुपरी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

काय घडले नेमके ?
अघोरी पूजा विधीच्या नावाखाली तौफिक मुजावर या भोंदूबाबाने पाटील कुटुंबाच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत कपड्यात गुंडाळून पाच लाख रुपये व चारशे ग्रॅम सोने घेऊन पसार झाला. या कालावधीत स्वामी बाबा परत न आल्यामुळे प्रवीण पाटील या शेतकर्‍याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपी तौफिक फकरुद्दीन मुजावर (28, रा.सोलापूर ता.संकेश्वर जिल्हा बेळगाव (कर्नाटक) याच्या विरोधात पनवेल (वाशिम) शहर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.






त्या अनुषंगाने मोबाइल लोकेशनवर आरोपीचा शोध घेतला असता तो हुपरी परिसरात आढळून आला असता सापळा रचून अटक केली. सखोल तपासातून सोने हुपरी शहरात विक्री झाल्याचे दिसून आले यातून सहा लोकांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. यातून हा सोने विक्रीचा मामला उघडकीस आल्याचे पोलीस निरीक्षक आर.बी.घेवडेकर यांनी सांगितले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !