लाडक्या बहिणींच्या मानधनात होणार मोठी वाढ : काय म्हणाले मुख्यमंत्री !


There will be a big increase in the honorarium of beloved sisters: What did the Chief Minister say! मुंबई (10 ऑगस्ट 2025) : भाजपाला सत्तेवर येण्यासाठी लाभदायी ठरलेल्या लाडकी बहिण योजनेचे मानधन वाढवण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार असून सध्या मिळणार्‍या मानधनात आणखी वाढ होणार असल्याची घोषणा त्यांनी मुलुंड येथे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात केली.

सावत्र भावांचे मनसुबे उधळले
मुख्यमंत्री म्हणाले की, योजना सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला आणि कोर्टात गेले मात्र लाडक्या बहिणींनी अनेक सावत्र भावांचे मनसुबे उधळले, असा टोला फडणवीस यांनी लगावला. सध्या योजनेचा लाभ अडीच कोटी महिला घेत आहेत. काही भावांनी बहिणींच्या नावानेच पैसे घेणे सुरू केले. काहींनी पुरुष आहे हे लक्षात येईल म्हणून मोटारसायकलचा फोटो लावला. असे सगळे शोधून काढले असून त्यांचे पैसे थांबवले आहेत मात्र अशा प्रत्येकाची पडताळणी करा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पात्र महिलांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र, घुसखोरांना बाहेर काढा, अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.






लाडकी बहिण योजनेत भ्रष्टाचार शक्य नाही
महायुती सरकारने राज्यात केजी ते पीजीपर्यंत शिक्षण मोफत केले आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील महिला थांबणार नाहीत. महिला थांबल्या नाहीत तर राज्याचा विकासही थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेत थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता नाही. तरीही विरोधक भ्रष्टाचाराचे आरोप करतात, असेही फडणवीस म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !