देशातील 334 पक्षांची मान्यता रद्द : राज्यातील ‘या’ पक्षांचा समावेश
Recognition of 334 parties in the country cancelled : These parties in the state included मुंबई (10 ऑगस्ट 2025) : देशातील 334 नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की, लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29- नुसार, कोणत्याही राजकीय पक्षाने नोंदणी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान एकदा निवडणूक लढवणे आवश्यक आहे. जर पक्षाने सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकांत भाग घेतला नाही, तर त्याला आयोगाच्या यादीतून वगळले जाऊ शकते.





आयोगाने या 334 पक्षांच्या निवडणूक सहभागाचा आणि नोंदणीकृत पत्त्यांचा तपास केला असता, ते सक्रिय नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना डिलीस्टेड म्हणजेच यादीतून वगळलेले पक्ष म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
राज्यात या पक्षांची मान्यता रद्द
1. अवामी विकास पार्टी
2. बहुजन रयत पार्टी
3. भारतीय संग्राम परिषद
4. इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया
5. नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी
6. नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
7. पीपल्स गार्डियन
8. द लोक पार्टी ऑफ इंडिया
9. युवा शक्ती संघटना
