मुंंबईच्या पाच संशयीतांना अवैध कॉल सेंटरमध्ये बेड्या

अमेरिका, कॅनडासह 5 देशांच्या नागरिकांना अ‍ॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गंडा


Five Mumbai suspects arrested in illegal call center ईतगपुरी (11 ऑगस्ट 2025) : ईगतपुरीत रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये चालणार्‍या अवैध कॉल सेंटरवर छापा टाकत तब्बल सव्वा कोटीची रोकड, अर्धा तोळा सोने व एक कोटीच्या सात लक्झरी कार जप्त करण्यात आल्या असून मुंबईतील पाच जणांना अटक करण्यात आली. दिल्ली व मुंबई सीबीआयने केलेल्या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपी अ‍ॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडासह पाच देशांतील नागरिकांची फसवणूक करत होते. या कारवाईत 62 ऑपरेटर कार्यरत, 44 लॅपटॉप, 71 मोबाईल, 2 हजार कॅनडेयिन डॉलर, 1.26 लाख गिफ्ट व्हॉउचर, 7 लक्झरी कार जप्त करण्यात आले आहे.






विशाल यादव, शाहबाज, दुर्गेश, अभय राज ऊर्फ राजा, समीर ऊर्फ कालिया ऊर्फ सोहिल या मुंबईतील पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

भाडेतत्त्वावर रिसॉर्टमध्ये घेतलेल्या खोल्यांत बहुधा रात्रीचेच काम सुरू असायचे. छाप्यावेळी 62 ऑपरेटर काम करत होते. दरम्यान, इगतपुरीचे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना या कारवाईचा मागमूसही नव्हता.

कॉल सेंटरमध्ये त्रिस्तरीय यंत्रणा होती. पहिल्या टप्प्यात डायलर म्हणून काही ऑपरेटर काम करायचे. ते आधी ग्राहकांना फोन करुन जाळ्यात ओढायचे. दुसर्‍या टप्प्यात व्हेरिफायर तर तिसर्‍या टप्प्यात क्लोजर म्हणून काही काम करायचे. सीबीआयने 10 दिवसांपूर्वी पुण्यात फोडलेल्या रॅकेटमध्येही फसवणुकीची हीच मोडस ऑपरेंडी होती. दोन्ही ठिकाणच्या संशयितांचे कनेक्शन असण्याची शक्यता आहे. तसेच, या रॅकेटचे अमेरिका, कॅनडातही हस्तक असल्याचा संशय सीबीआयने वर्तवला असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !