महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचे वाहन उलटले : जागीच नऊ भाविक ठार
Vehicle carrying devotees on their way to see Mahadev overturns: Nine devotees killed on the spot पुणे (11 ऑगस्ट 2025) : पिकअप व्हॅन उलटून नऊ महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, 11 रोजी दुपारी घडली. या अपघातामध्ये जवळपास 35 भाविक जखमी झाले.
काय घडले पुण्यात
पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर तालुक्यात पाईट येथील कुंडेश्वर येथे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. श्रावण सोमवारचे औचित्य साधून 11 रोजी सकाळी अकराच्या सुमारास भाविकांची एक व्हॅन कुंडेश्वर येथे निघाल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळले व तेथेही वाहनाने तब्बल पाच-सहा पलट्या खाल्ल्या.





यांचा ओढवला मृत्यू
या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन कालूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कनिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरगे, बयदाबाई नयनेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरगे यांचा मृत्यू ओढवला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
हे भाविक झाले जखमी
अपघातात अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोलेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे, जया बालू दरेकर, लता ताई करांडे, ऋतुराज कोटवाल, ऋषिकेष करांडे, निकिता पापल, जयश्री पापल, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोलेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करांडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सिद्धि ज्ञानेश्वर पापल, कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धिकर रामदास चोरगे, छब्बाबाई निवृत्ती पापल, सुलोचना कोलेकर, मंगल शरद दरेकर, पूनम वनजी पापल, जयाबाई वनजी पापल, चित्रा शरद करांडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापल जखमी झाले.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख
अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीएमओने ट्विट करत म्हटले, पुणे येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्या सर्वांप्रति शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
अपघात प्रचंड भीषण असून मृतांची संख्या वाढू शकते, असे पाईटचे माजी सरपंच जयसिंग दरेकर यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते देखील तातडीने घटनास्थळी दाखल झालेत.
दरम्यान, घाट चढताना अचानक व्हॅन मागे आली. त्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. अपघातामधील मृत आणि जखमी भाविक पापळवाडी येथील असल्याचे समजते. यातील जखमींवर सध्या पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली.
