शिर्डी हादरले : पत्नी नांदायला न आल्याने चार मुलांना विहिरीत ढकलत पित्याची आत्महत्या


Shirdi shaken : Father commits suicide by pushing four children into well as wife did not come to bathe शिर्डी (16 ऑगस्ट 2025) : कौटूंबिक वादातील कलहानंतर माहेरी गेलेली पत्नी पुन्हा सासरी यायला तयार नसल्याने संतप्त पतीने आपल्या पोटच्या चार गोळ्यांना विहिरीत ढकलत स्वतःही आत्महत्या केली. ही धक्कादायक क्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात घडली.

कोर्‍हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत पाच मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. अरुण काळे (30) असे आत्महत्या करणार्‍या पित्याचे नाव आहे.






अरुण काळे हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावातील रहिवासी असून त्याच्या संसार वेलीवर तीन मुलांसह एक मुलगी होती. कौटुंबिक वादामुळे पत्नी आठ दिवसांपूर्वी सोडून गेली मात्र त्यानंतर आलेल्या नैराश्यातून काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चारही मुलांना विहिरीत ढकललं
अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोर्‍हाळे गावच्या शिवारात चारही मुलांना विहिरीत ढकलले. शिवाणी अरुण काळे (8), प्रेम अरुण काळे (7), वीर अरुण काळे (6), कबीर अरुण काळे (5) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात-पाय बांधून आत्महत्या केली.

दोन मृतदेहांचा शोध सुरू
विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !