भुसावळ शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत वृक्षारोपण


Tree plantation at Ordnance Factory in Bhusawal city भुसावळ (17 ऑग्स्ट 2025) : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त बौद्ध मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळच्या सहकार्याने सुभाष नगर, ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट भागात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यकारी निदेशक निरंजन लाल, यंत्र महिला कल्याण समिती अध्यक्षाशोभाना शर्मा यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ऑर्डनेन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक रघू नंदन झा, पंकज खांडेकर, सर्व अधिकारी आणि महिला कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी महिला, अंकुर विद्या मंदिराच्या प्राचार्य, सर्व शिक्षिका, पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल, डी.एस.नंदेश्वर व एच.एम. सुरेश नरहिरे, सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम ती, जेसीएम चार सदस्य, कार्य समितीचे सदस्य आदींची उपस्थिती होती. विनोद पवार, किशोर सूर्यवंशी, पंकज पाटील, तुषार बडगुजर, सत्यवान बिंद्रा, जितू आंबेडकर, राजू बादशहा, अशोक ताठे, हरित निर्माणी आदीही उपस्थित होते.


यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, महासचिव एम.एस.राऊत, कॅशियर संजय एस.आहिरे, महेंद्र इंगले, दीपक सपकाळे, मुकेश तायडे, एम.डी.वानखेडे, आकाश सपकाळे, विलास खरात, संदीप सुरवाडे, विजय साळुंके, दिनेश मेटकर, मायकल तायडे, वीरेंद्र मोरे, प्रतीक सुरवाडे, यश वानखेडे, यश सुरवाडे, निशांत सुरवाडे, स्नेहल राऊत, पुष्कर शिरनामे, जाकीर तडवी, सोमेश्वर ठाकूर, रोहित भालेराव, कल्पेश संदानशीव, विशाल पिवाल, हर्षल सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !