ग.स.सोसायटी शाखेत डॉ.जगदीश पाटील यांना ध्वजारोहणाचा मान
Dr. Jagadish Patil भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : देशाच्या स्वातंत्र्यदिनी शहरातील विकास कॉलनीमधील ग.स.सोसायटी शाखेत सोसायटीचे सभासद तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.जगदीश पाटील यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन ध्वजवंदन करण्यात आले.
ध्वजारोहणाचा विशेष आनंद
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंगी ध्वजाला वंदन केले. यावेळी डॉ.जगदीश पाटील म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान आयुष्यात पहिल्यांदाच मला मिळाला. या अनोख्या क्षणाने मला विशेष अभिमान व आनंद लाभला. हा क्षण अविस्मरणीय ठरला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शाखाधिकारी विजय सूर्यवंशी व युवराज पाटील, उपशाखाधिकारी विजय भारंबे व नितीन कचरे, लिपीक सिद्धार्थ बिर्हाडे व प्रदीप देशमुख उपस्थित होते.





