भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम


‘Har Ghar Triranga’ campaign भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित केलेल्या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रा.श्रेया चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

प्राचार्यांनी दिली त्याग, बलिदानाची माहिती
राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित या रांगोळी स्पर्धे प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांनी घेतलेले कष्ट, त्याग आणि बलिदान या विषयी माहिती दिली. तसेच अत्यंत संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी राष्ट्रनिष्ठा हे मूल्य सांभाळण्याची गरज आहे हे स्पष्ट केले.


रांगोळी स्पर्धेनंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग यांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीत उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशाच्या स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा झेंडा हातात घेतलेला होता. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्यात.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व शिक्षकांसह अनेक विद्यार्थ्यांनी देशाचा तिरंगा झेंडा हातात उंचावून सेल्फी काढत राष्ट्रध्वजाबद्दलचा आपला अभिमान स्पष्ट केला.

यांचा रॅलीत सहभाग
प्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.धनश्री नेहेते, प्रा.सुशीला भाटे, प्रा.भाग्यश्री नेमाडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा. कामिनी चौधरी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !