भुसावळ इनरव्हील रेल सिटीने दिला मोहराळे आश्रमशाळेला दिला टीव्ही संच भेट


Bhusawal Innerwheel Rail City gifted a TV set to Moharale Ashram School भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीने मुंबई येथील नितीन पाटील यांच्या उत्तुंग भरारी फाउंडेशन व मातानंद वेल्फेअर फाउंडेशन यांच्या सौजन्याने एक 55 इंची एलईडी टीव्ही मोहराळे आश्रमशाळेत भेट दिला. याप्रसंगी नितीन पाटील यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा याचा लाभ घेतला.

यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष सोनू मांडे म्हणाले की, टीव्ही भेट दिल्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळेस राष्ट्रभक्तीपर चित्रपटाबरोबर, प्रेरणादायी शॉर्ट फिल्म व जीवन चरित्र सुद्धा दाखवता येणार आहे. त्याच बरोबर प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने युट्युबवर दाखवता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार आहे. मी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व उत्तुंग भरारी फाउंडेशन यांना मनापासून धन्यवाद देतो.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षा सीमा सोनार व प्रकल्प प्रमुख अनिता महाजन तसेच उत्तुंग भरारी फाउंडेशनचे नितीन पाटील, संस्थाध्यक्ष सोनुभाऊ मांडे व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुनीता पाचपांडे, रेवती मांडे, हेमलता सोनार, कविता पाचपांडे, आदिती भडंग, आरती पाटील, विनिता नेवे, रणजीतकौर थेटी यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !