भुसावळात गोगादेव नवमीनिमित्ताने छडी मिरवणूक ठरली लक्षवेधी
ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी : समाजबांधवांमध्ये अपूर्व उत्साह
The cane procession on the occasion of Gogadev Navami in Bhusawal became an eye-catcher भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सव रविवार, 20 ऑगस्ट रोजी शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील जामनेर रोडवरील मेहतर वाल्मिकी नगरातून छड्यांची मिरवणूक काढण्यात आली. छड्यांच्या मिरवणुकीतील विविध आरास साकारण्यात आले. चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी उपस्थितांमध्ये रोमांच उभा केला तर जामनेर रोडवरील वाहतूक सायंकाळनंतर वाहतूकीसाठी बंद करण्यात आली होती.
छडी मिरवणुकीने वेधले लक्ष
मेहतर वाल्मिकी समाजाचे आद्यदैवत जाहरवीर गोगादेवजी नवमी शहरात रविवारी छड्यांची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जामनेर रोड, स्टेशन रोड, मॉर्डन रोड, गांधी चौकी, सराफ बाजार, नृसिंह मंदिर या मार्गाने निघालेल्या मिरवणुकीचा वाल्मिक नगरात समारोप झाला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

गोगा नवमी उत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या छडी मिरवणूकीत विविध आरास तसेच वहनांचा समावेश होता. या आरास लक्षवेधी ठरल्या. यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. यामुळे जामनेर रोडवरील वाहतूक अवजड व मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. उर्वरित एकेरी मार्गांवरुन दुचाकी व तिनचाकी रिक्षांची वाहतूक सुरु होती.
प्रमुख मार्गांवर रोशणाई
वाल्मिक नगर ते बाजारपेठ पोलिस ठाणे, अमर स्टोअर्स, स्टेशनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉर्डनरोड, मरिमाता मंदिर मार्गे वाल्मिक नगरपर्यंत रस्त्यावर प्रखर प्रकाशाचे दिवे लावण्यात आले होते. तर जामनेररोड, मामाजी टॉकीज मार्ग आदींसह विविध भागांमध्ये रोषणाई करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या यामुळे छडी मिरवणूक काढताना भाविकांना अडथळे निर्माण झाले नाहीत.




