भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात ‘अँटी रॅगिंग कायदा साक्षरता सप्ताह’ उत्साहात


भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समिती अंतर्गत अँटी रॅगिंग सेल मार्फत अँटी रॅगिंग कायदा साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव विभाग प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.राजू फालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रॅगींग हा गंभीर गुन्हा : प्राचार्य डॉ.राजू फालक
अँटी रॅगिंग कायदा म्हणजे महाविद्यालये, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग (छळ, त्रास देणे, मानसिक/शारीरिक अत्याचार करणे) थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी केलेली नियमावली व शिक्षांचे प्रावधान यावर सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य आर.पी.फालक यांनी केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार रॅगिंग हा गंभीर गुन्हा मानला जातो. शैक्षणिक संस्था व कॉलेज प्रशासनावर जबाबदारी आहे की, रॅगिंग रोखावी, त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.


यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.एस.पाटील, सुनील ठोसर आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !