भुसावळात 23 रोजी शाडू मातीतून गणेश मूर्ती बनवण्यावर कार्यशाळा

प्रतिष्ठा महिला मंडळासह दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासचा संयुक्त उपक्रम


भुसावळ (19 ऑगस्ट 2025) : पीओपी मूर्तीमुळे होणारे प्रदूषण व दुष्पपरिणाम पाहता शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळासह दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा मूर्ती बनविण्याची कार्यशाळा मुलांसाठी शनिवार, 23 रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील संतोषी माता सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

नाव नोंदणी करण्याचे आवाहन
पर्यावरणपूरक कार्यशाळेत सहभाग नोंदवण्यााठी जयश्री चौधरी (9158823288), अनिता आंबेकर (9623037418), सोनल महाजन (913037418), वैशाली सैतवाल (9511886655), राजश्री बादशाह (8600783976), हिमाली फालक (98237 75818), ज्योती राठोड (9503688911), सीमा सोनार (9423975702), योगीाता वायकोळे (8928575223) यांच्याशी गुरुवार, 21 ऑगस्टपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कार्यशाळेसाठी या वस्तू आणणे आवश्यक
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेसाठी येताना मूर्ती ठेवायला जाड पॅड किंवा पुठ्ठा आणावा, पाण्यासाठी छोटा मग आवश्यक, पिण्याच्या पाण्याची बॉटल, नाश्त्याचा डबा, नॅपकीन, जुना न्युज पेपर आणणे गरजेचे असून मूर्ती बनवणसाठी लागणारी माती मंडळातर्फे दिली जाणार आहे. मुलांकरिता आयोजित ही कार्यशाळा निःशुल्क असली तरी नाव नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !