भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात सद्भावना दिन उत्साहात


Sadbhavana Day celebrated with enthusiasm at De.N.A. Bhole College in Bhusawal भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकका अंतर्गत सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.आर.पी.फालक यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

प्राचार्य फालक म्हणाले की, सद्भावना दिवस हा सर्व धर्माच्या भारतीयांमधे राष्ट्रीय एकता, शांतता, सहानुभूती आणि सांप्रदायिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.


प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी व बंधुभावासाठी शपथ घेतली.

यावेळी रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा. एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !