अपयशाने यचून न जाता परिस्थितीवर मात केल्यास यश सहज शक्य : प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे
Principal Dr. R.R. Khandare भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. स्वतःला कमजोर समजू नका. स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व काय याचा विचार करा. जीवनात अपयश, दुःख आले तर त्यावर मात करा. सर्वप्रथम मनाची तयारी करावी. वेळेचे नियोजन करावे तसेच परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे यांनी येथे व्यक्त केले.
भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयरात विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.डी.एन.पाटील, उपप्रचार्य प्रा.डॉ.जी.आरवाणी, करियर समुपदेशन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे उपस्थित होते.

परीक्षेची आवड छंदात रुपांतर केल्यास यश सहज शक्य
प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांनी पहिले गुरु पुस्तकांना मानले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणार्या विविध मासिके, वर्तमानपत्राचे वाचन करावे, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करून त्याचे छंदात रूपांतर केले तर लवकर यशस्वी होता येते.
स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे म्हणाले की, कोणतेही शिक्षण कमी नाही. स्वप्न पूर्ण करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साधण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करावे व महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर टाकावी.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.दिनानाथ पाठक यांनी तर आभार प्रा.डॉ.पी.एच.इंगोले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.डॉ.ममताबेन पाटील, प्रा.डॉ.विलास महिरे, प्रा.हर्षल पाटील, प्रा.डॉ.संगीता भिरूड, प्रा.डॉ.सचिन कोलते, प्रा.डॉ.सचिन राजपूत, प्रा.डॉ.अजय क्षीरसागर, प्रा.गौतम भालेराव, डॉ.स्वाती महाजन, प्रा.वंदना महाजन व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




