भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा माजी विद्यार्थी सौरभ चौधरीच्या पुस्तकाचे प्रकाशन
यावल (22 ऑगस्ट 2025) : अट्रावल, ता.यावल गावातील मूळ रहिवासी व भुसावळच्या के.नारखेडे विद्यालयाचा माजी विद्यार्थी सौरभ चौधरी यांनी सरदार पटेल विद्यापीठ, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. धर्मेश रायकुंडलीया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मायक्रोसॉप्ट एक्सल वापरून सांख्यिकीय विश्लेषण सोपे’ केलल्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले.
हे पुस्तक संख्याशास्त्र, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण, योगिक विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, मानसशास्त्र तसेच शिक्षणशास्त्र व संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये मायक्रोसॉप्ट एक्सलच्या सहाय्याने केस स्टडी आधारित उदाहरणे टप्प्याटप्प्याने व सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्याचा संस्थेने केला गौरव
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळचे संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांनी सौरभ चौधरी यांचा सत्कार करून गौरव केला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, बी.बी.जोगी, एस.एस.कापसे, प्रशांत चौधरी, सौरभ चौधरी यांचे वडील राजेंद्र चौधरी हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीसाठी त्यास शुभेच्छा दिल्या.
गेल्या दशकापासून चौधरी हे संख्याशास्त्रीय विश्लेषक व प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी व संशोधकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करतात तसेच संशोधन प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करतात.




