प्रवाशांनो लक्ष द्या : कटनी-भुसावळ एक्स्प्रेसची वेळ बदलली, तुम्हाला माहिती आहे का ?


Katni-Bhusaval Express timings changed भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : तुम्ही कटनी-भुसावळ एक्स्प्रेसने प्रवास करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या गाडीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने काहीसा बदल केला असून त्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

भुसावळ विभागाद्वारे संचलित गाडी क्रमांक 19014 कटनी – भुसावळ एक्सप्रेसच्या खंडवा ते भुसावळ या दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 सप्टेंबर 2025 पासून प्रभावी राहील.


प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी खंडवा स्थानकावर 3.15 वाजता आल्यानंतर 3.20 वाजता सुटेल.

बरगाव गुजर स्थानकावर 3.29 वाजता आल्यानंतर 3.30 वाजता सुटेल.

डोंगरगाव स्थानकावर 3.54 वाजता आगमन व 3.55 वाजता प्रस्थान करेल.

सागफाटा स्थानकावर दुपारी 4.44 वाजता आल्यानंतर ती 4.5 वाजता सुटेल.

नेपानगर स्थानकावर ती 4.18 वाजता आल्यानंतर 4.20 वाजता सुटेल.

बर्‍हाणपूर स्थानकावर 4.42 वाजता आल्यानंतर 4.45 वाजता सुटेल.

वाघोदा स्थानकावर 4.59 वाजता आल्यानंतर पाच वाजता सुटेल.

रावेर स्थानकावर 5.9 वाजता आल्यानंतर ती 5:10 वाजता सुटेल.

निंभोरा स्थानकावर 5.19 वाजता आल्यानंतर ती 520 वाजता सुटेल.

सावदा स्थानकावर 5.39 वाजता आल्यानंतर ती 5.40 वाजता सुटेल.

भुसावळ स्थानकावर गाडीचे 6.35 वाजता आगमन होईल.

रेल्वे प्रशासनाने प्रवासाचे नियोजन करताना वेळेचा बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !