यावल महाविद्यालय व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे रक्तदान शिबिर


Blood donation camp organized by Yaval College and Prajapati Brahmakumari Iswariya Vishwa Vidyalaya यावल (24 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व बंधुत्व दिवस यानिमित्ताने रक्तदान शिबिर 23 ऑगस्टला लक्ष्मी नगरात झाले. या शिबिराला यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, रेड क्रॉसचे मेडिकल ऑफिसर डॉ.सोनवणे शिवसेना शहरप्रमुख पंकज बारी, नाना भाई प्रभाकर आप्पा सोनवणे व त्यांचे चिरंजीव संदीप सोनवणे, अमोल भारुड यांनी भेट दिली.

रक्तदान हे श्रेष्ठ दान
यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपल्या मार्गदर्शनातून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगत प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करायला हवे, असे आवाहन केले.


या रक्तदान शिबिरात एकूण 37 रक्तदात्यानी रक्तदान केले.व समाजापुढे एक आदर्श निर्माण केले. यावेळी यावल महाविद्यालय व प्रजापती ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्याचे एक रोप देऊन स्वागत करण्यात आले.यात यावल महाविद्यालयातील विद्यार्थिनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. यावल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले.

महाविद्यालयातील एन.एस.एस.विभाग प्रमुख डॉ.पी.व्ही.पावरा, प्रा.सी.टी.वसावे, प्रा.भावना बारी, प्रा.इमरान खान प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागातील विद्यार्थ्यांनी या शिबिरास विशेष सहकार्य केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !