भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर


Free health check-up camp tomorrow at P.K. Kotecha College, Bhusawal भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : शहरातील शांती नगरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत करण्यात आले आहे. भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद अग्रवाल असतील.

प्राध्यापकांची होणार मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी मोफत करण्यात येईल शिवाय मोफत औषधोपचारासह आरोग्याविषयी डॉक्टर मार्गदर्शन करतील. या शिबिरासाठी डॉ.धनुष, सिस्टर बरखा, सिस्टर गुणगुण उपस्थित राहणार असल्याचे पीआरओ गणेश वाघ यांनी कळवले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !