मुक्ताईनगर बसस्थानकासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर


राज्यातील 19 तीर्थक्षेत्रांची बसस्थानके होणार सुसज्ज ; माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर तालुक्याला अध्यात्मिक तसेच ऐतिहासिकतेची जोड लाभलेली आहे त्यामुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील श्री क्षेत्र कोथळीसह चांगदेव, मेहुण, हरताळा, चारठाणा आदी ठिकाणी भाविकांची वर्षभर वर्दळ असल्याने मुक्ताईनगर बसस्थानकातून भाविक असलेल्या प्रवाशांना सर्वोतोपरी सुविधा मिळण्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला असून यासह राज्यातील 18 तीर्थस्थळांच्या ठिकाणच्या बसस्थानकांचे सर्व सोयींनी युक्त बसस्थानकात रूपांतर करण्यासाठी निधी देण्याची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. या घोषणेची आता पूर्तता झाली असून 19 तीर्थक्षेत्रांसाठी 103 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर बसस्थानकासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. या निधीतून बसस्थानकाचे नुतनीकरण करून प्रवाशी भाविकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.


कॉपी करू नका.