कॉरंटाईन महिलेवर तिघा नराधमांनी केला बलात्कार
नवी दिल्ली : राजस्थानमधील सवाई माधवपुर जिल्ह्यातील क्वारंटाईन केलेल्या 40 वर्षीय महिलेवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तिघांविरोधात शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे पीडित महिला सवाई माधवपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून अडकली असून गावकर्यांनी तिच्या राहण्याची व्यवस्था सरकारी शाळेत केली होत. मात्र त्याच गावातील तीन तरुणांनी गुरुवारी रात्री महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तिनही आरोपींचे वय 20 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.