बुलंदशहरात साधूंची हत्या : आरोपी ताब्यात


बुलंदशहर : उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पगोना गावातील शंकराच्या मंदिरात साधू जगनदास (55) व सेवादास (35) यांची हत्या झाल्याची घटना काल रात्री घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उउाली होती. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने नशेत हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. दोन्ही साधू झोपले असताना आरोपीने हल्ला चढवला व त्यात साधूंचा मृत्यू ओढवला. मंगळवारी सकाळी ग्रामस्थ मंदिरात पोहोचले असता दोन साधुंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं आढळून आलं. यानंतर मंदिर परीसरात मोठी गर्दी जमली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपीने साधुंचा चिमटा उचलला होता त्यावरुन साधू त्याला ओरडल्यानंतर आरोपीने काल रात्री साधुंची हत्या केली, अशी माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !