चाळीसगावातील आ.बं.मुलांच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी शरद जाधव


Sharad Jadhav appointed as Principal of A.B. Boys’ High School in Chalisgaon चाळीसगाव (5 ऑक्टोबर 2025)  : शहरातील शतकोत्तर परंपरा असलेल्या आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलच्या नूतन मुख्याध्यापकपदी शरद नारायण जाधव यांची नियुक्ती करण्यात आलाी.

यावेळी त्यांचा पदभार व सत्कार चा.ए.एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन तथा आ.बं.मुलांचे हायस्कुलचे चेअरमन योगेश अग्रवाल, सिनिअर कॉलेज कमिटी चेअरमन सुरेश स्वार, समन्वय समितीचे चेअरमन मु.रा.अमृतकार आदींच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी व पालक केंद्रीत उपक्रमांकावर भर
मुख्याध्यापक शरद जाधव म्हणाले की, मी संस्थेच्या हिताचे व शिक्षक विद्यार्थी पालक केंद्रित उपक्रम यावर भर असेल व संस्थेची पताका सर्वदूर कशी फडकेल यावर भर दिला जाईल.

यावेळी उपमुख्याध्यापक एम.बी.कुमावत, पर्यवेक्षक पी.डी.नेरकर, पर्यवेक्षिका एस,एम,कासार, कार्यालयीन प्रमुख नरंजन लद्दे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !