कोरोना : देशात 1823 नवे रुग्ण आढळले


नवी दिल्ली : भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे तर आतापर्यंत एक हजार 75 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 हजार 162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून आठ हजार 373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक हजार 823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !