जळगाव हादरले : धारदार शस्त्राने 27 वर्षीय तरुणाची हत्या 


Jalgaon shaken : 27-year-old man murdered with a sharp weaponजळगाव (15 डिसेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे (27) या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्र मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास समोर आला.

जागीच झाला मृत्यू
अज्ञात मारेकर्‍यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला गंभीर जखमी अवस्थेत निमखेडी गावातील राममंदिराच्याजवळ फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मयत घोषित केले. मृत सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.



दरम्यान हा खून कोणत्या वादातून झाला ?, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !