दुचाकीच्या डिक्कीतून 83 हजार लांबवले : जळगावातील घटना
83,000 rupees stolen from a two-wheeler’s storage compartment: Incident in Jalgaon जळगाव (15 डिसेंबर 2025) : मेडीकलवर औषधी घेण्यासाठी गेलेल्या एकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 83 हजार रुपयांची रोकड लांबवली. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेरा चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष विचलित होताच चोरी
शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे दीपक रमेशचंद गगराडे यांचे संतोषी माता नगरात किराणा दुकान आहे. 10 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दीपक गगराडे हे दुकान बंद करुन दिवसभरात झालेला ग्राहकांचे गल्ल्यातील 83 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि ते दुचाकी (एम.एच.19 सी.एम. 3038) ने घराकडे निघाले. काशिनाथ चौकाकडून शेरा चौकाकडे जाणार्या रस्त्यावरील भूमी हॉटेलच्या समोर असलेल्या मेडीकलवर गगराडे हे औषधी घेण्यासाठी गेले. औषधी घेवून ते दुचाकीने घरी गेले, त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता, त्यांना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली 83 हजार रुपयांची रोकड दिसून आली नाही.


अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
दीपक गगराडे हे दुचाकीच्या डिक्कीतून पैसे रस्त्यात पडले असावे हे बघण्याकरीता ज्या रस्त्याने आले. त्याच रस्त्याने ते पैसे शोधत गेले. परंतू त्यांना पैसे मिळून आले त्यामुळे दीपक गगराडे यांना खात्री झाली की, ते औषधी घेण्याकरीता मेडीकलवर गेले त्यावेळी कोणतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे चोरुन नेले. दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पैसे चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रमोद लाडवंजारी करीत आहे.







