मौखिक आरोग्य स्वस्थ व निरोगी असल्यास आरोग्य सुदृढ : डॉ.प्राजक्ता जोशी
Good oral health leads to overall good health: Dr. Prajakta Joshi भुसावळ (17 डिसेंबर 2025) : मनुष्याच्या सुदृढ शरीराची सुरुवात त्याचा तोंडापासून होते. मुखाचे आरोग्य चांगले व स्वस्थ असेल तर व्यक्तीचे दात मजबूत असतील तर अन्नपचनापर्यंची सर्व क्रिया चांगल्या पद्धतीने होऊन शकते त्यामुळे आरोग्य चांगले राहते व मनुष्य निरोगी राहू शकतो, असे विचार श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शीतकालीन शिबिरात फेकरी येथे डॉ.प्राजक्ता जोशी यांनी व्यक्त केले.
चेहर्याचे सौंदर्य दातांवर
डॉ.जोशी म्हणाल्या की, सकाळ व संध्याकाळी दातांना ब्रश करणे आवश्यक असते. दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम मोठे होतात आणि त्यासाठी खर्च देखील खूप येतो. चेहर्याचे सौंदर्य दातांवर अवलंबून असते म्हणून दातांच्या आरोग्याबाबत प्रत्येकाने सजग असले पाहिजे. दंतरोग डॉक्टरांकडून आपल्या दातांची वेळोवेळी तपासणी अवश्य करून त्यावर उपचार करून घेतले पाहिजे.




यांची होती उपस्थिती
प्रसंगी गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा, डॉ विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. सात दिवसीय शिबिर ग्रामपंचायत फेकरी येथे सुरू आहे.