भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या अभिजीत बेहडेची विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड


Abhijit Behde from D.N. Bhole College in Bhusawal has been selected for the divisional bodybuilding competition भुसावळ (17 डिसेंबर 2025) :जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धा कला व विज्ञान महाविद्यालय भालोदला झाल्या. त्यात एफ.वाय.बी.ए.वर्गातील अभिजीत प्रदीप बेहडे याने 65 वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. त्याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धा महाविद्यालय, भालोदसाठी निवड झाली.

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल व निवड झाल्याबद्दल जळगाव विभाग प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !