दुचाकी अपघातात निंभोर्यातील पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
रात्री फिरायला नेले व तो प्रवास मुलासाठी ठरला अखेरचा
A five-year-old child from Nimbhora died in a two-wheeler accident. भुसावळ (18 डिसेंबर 2025) : मुलाला दुचाकीवरून बाहेर फिरण्यासाठी नेल्यानंतर दुचाकी अपघातात निंभोर्यातील रहिवासी असलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. लक्ष्य शंकोपाळ (5) असे मृताचे नाव आहे.
काय घडले चिमुकल्यासोबत ?
यावल तालुक्यातील बोरावल येथील मुळ रहिवासी व हल्ली दीपनगरात नोकरीयस असलेले व निंभोरा येथे वास्तव्यास असलेले कैलास शंकर शंकोपाळ हे मंगळवार, 16 रोजी रात्री मुलासोबत फिरण्यासाठी गेल्यानंतर भुसावळकडून परत निंभोरा येथे जात असतांना वरणगाव रोडवर त्यांची दुचाकी महामार्गावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात मुलगा लक्ष्य हा जखमी झाला. त्याच्यावर उपचार होत असतांनाच त्याचा रात्री मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


दुभाजकावर आदळली दुचाकी
मंगळवार, 16 रोजी कैलास शंकोपाळ हे निंभोरा येथील त्यांच्या घरून दुचाकीवर ुलगा लक्ष्य (5) ला सोबत घेवून निघाले. शंकोपाळ हे भुसावळकडे आले व परतीच्या प्रवासात महामार्गावरील हॉटेल शेरे पंजाबजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला व ती दुभाजकावर आदळली. अपघातात कैलास शंकोपाळ यांना मार लागला तर मुलगा लक्ष्य याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला जखमी अवस्थेत शहरातील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. रेखा पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार तेजस पारीसकर करीत आहे.







