भुसावळात रोकड लुटताना गोळीबार : तीन संशयीत यंत्रणेच्या जाळ्यात


Shooting during a cash robbery in Bhusawal : Three suspects apprehended by the authorities. भुसावळ (18 डिसेंबर 2025) : पानटपरीवर लुटीच्या उद्देशाने आलेल्या चौघांपैकी एकाने प्रतिकार करणार्‍या 39 वर्षीय प्रौढावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जळगाव रोडवरील स्व.नारायण पाटील व्यापारी संकुलाजवळ बुधवारी रात्री उशिरा घडली होती. या प्रकरणी रात्री उशिरा शहरातील विविध भागातून तीन संशयीतांना भुसावळ शहर, बाजारपेठ व गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. भुसावळात झालेल्या गोळीबाराने मात्र पुन्हा गुन्हेगारी उफाळून आल्याचे चित्र समोर आल्याने सर्वसामान्यांमध्ये घबराट पसरली आहे.

काय घडले भुसावळ शहरात ?
भुसावळच्या जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणार्‍या पुलाच्या बाजूला स्व.नारायण पाटील व्यापारी संकुल आहे. या संकुलाजवळ असलेल्या पान टपरीवर उल्हास पाटील (39, जुना सातारा, भुसावळ) हे उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली व रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उल्हास गणेश पाटील यांनी संशयीताना विरोध केल्यानंतर एकाने सोबत आणलेल्या कट्ट्यातून एक गोळी झाडल्याने ती उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबारानंतर या भागात मोठी घबराट पसरून पळापळ झाली तर संशयीत पल्सर व मोपेडवरून पसार झाले.



रात्री उशिरा तीन संशयीत ताब्यात
गोळीबारानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र प्रत्यक्षदर्शी तसेच सीसीटीव्ही फुटेज तसेच खबर्‍यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागातून तीन संशयीतांना शहर, बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. संशयीत अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती असून अधिक माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !