साकळी जि.प.मुलांच्या शाळेत बाल आनंद मेळावा


Bal Anand Mela at Sakli District Boys School यावल (18 डिसेंबर 2025) : यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत मोठ्या उत्साहात आनंद मेळावा पार पडला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व मुख्यमंत्री माझी- सुंदर शाळा- टप्पा 2 अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान प्राप्त झाले.

बाल आनंद मेळाव्याला प्रतिसाद
साकळी ता.यावल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व मुख्यमंत्री माझी- सुंदर शाळा- टप्पा 2 अंतर्गत ग्रामपंचायत साकळी व व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद जिल्हा परिषद मुलांची शाळा साकळी यांचे संयुक्त विद्यमाने शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच दीपक नागो पाटील यांच्याहस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना 1111/ रुपयाचे बक्षीस दिले.





यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्षा शोभा जैन व सदस्य, केंद्रप्रमुख किशोर चौधरी, जिल्हा परिषद मुलीच्या शाळेचे अध्यक्ष सौरभ जैन, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक मोहन पिंगळे, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक केदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध असे खाद्यपदार्थांची स्टॉल लावले होते. उपस्थित मान्यवर तसेच पालकांनी प्रत्येक स्टॉल वरील खाद्यपदार्थ विकत घेऊन आस्वाद घेतला. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण, व्यवहार ज्ञान तसेच संभाषण कौशल्य वाढीस लागण्यास मोठी मदत झाली. या मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.

यावेळी साकळी मुलांच्या शाळेत त्रैमासिक शैक्षणिक पालक मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला. यात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम, मानसिक आरोग्य, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम, याबाबत चर्चा करण्यात आली व पुढील तीन महिन्याचे शैक्षणिक गुणवत्ता बाबत नियोजन करण्यात आले. यावेळी शिक्षक भारत पाटील, रवींद्र ठाकरे, प्रीती राणे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. आभार समाधान कोळी यांनी मानले. गावातील सर्व पालक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !