मध्य रेल्वेचा निर्णय ; पुन्हा पाच रेल्वे गाड्यांमध्ये तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली लागू


Central Railway’s decision; the OTP system for तत्काल ticket booking reintroduced in five trains. भुसावळ (19 डिसेंबर 2025) : तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि खर्‍या प्रवाशांना तिकीट मिळावे यासाठी भारतीय रेल्वेने ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांमध्ये 19 डिसेंबरपासून ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यामुळे तत्काळ तिकीटातील काळाबाजार रोखता येणासर आहे. यापुढे तत्काळ तिकीट काढतांना प्रवाशांना त्याचा मोबाईल जवळ ठेवणे आवश्यक राहाणार आहे.

ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य
नव्या प्रणालीअंतर्गत संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट तसेच आयआरसीटीसी वेबसाईट व मोबाईल पवरून होणार्‍या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे. बुकिंगदरम्यान प्रवाशाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एकदाच वापरता येणारा संकेतांक (ओटीपी) पाठवण्यात येईल. ओटीपीची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच तत्काळ तिकीट जारी करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, या प्रणालीमुळे एजंटमार्फत होणारा गैरवापर कमी होईल तसेच तत्काळ कोट्यातील तिकीटांचा लाभ खर्‍या गरजू प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी बुकिंगच्या वेळी आपला मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.





ओटीपी प्रणाली लागू होणार्‍या गाड्या
11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोंडा गोदान एक्सप्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस, 11025 पुणे जंक्शन – अमरावती एक्सप्रेस आणि 12157 पुणे जंक्शन-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांना ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !