भुसावळातील एन.के.नारखेडे स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांची धमाल

मान्यवरांच्या हस्ते वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात


9cभुसावळ (19 डिसेंबर 2025) : शहरातील एन.के.नारखेडे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व रायझिंग स्टार 2025-26 या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन सोहळा गुरुवार, 18 रोजी शहरातील बालाजी लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांची उधळण करीत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. प्रसंगी दहावी मार्च 2025 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाने गौरवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मकरंद नारखेडे होते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सभासद भाग्येश नारखेडे, जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, सदस्य विकास पाचपांडे, वकील पी.ई.नेमाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे आदींची उपस्थिती होती.





विद्यार्थ्यांनी केली कलागुणांची उधळण
मुलांनी केलेले नृत्य कौतुकास्पद ठरले. नवे जुने गाणे, ऋतू, असे विविधरंगी कार्यक्रम पार पडले. मोबाईल थीम, रॅगिंग थीम, देवी स्तुती, दशावतार, महाभारत गीत, शिवजयंती सोहळा, संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केले

सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. यासाठी मिस रुही बासीत, प्रियंका नेहेते यांनी मार्गदर्शन केले. आभार शबनम तडवी यांनी मानले. सर्व शिक्षिकांना शाळेतील मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे, रुपाली झोपे यांचे मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !