भुसावळातील गोळीबार प्रकरण : चौथ्या पसार संशयीताचा कसून शोध


Bhusawal shooting incident: Intensive search underway for the fourth absconding suspect भुसावळ (20 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवार, 17 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी चार पैकी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून या प्रकरणातील पसार संशयीताचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. पसार संशयीत हा नशिराबादचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय घडले भुसावळात ?
जळगाव रोडवरील जुना सातारा भागात खळवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर शिवछत्रपती बेंजो ग्रुपच्या फलकामागील टपरी परिसरात विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर तोंड बांधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात उल्हास गणेश पाटील (39, रा.जुना सातारा) हे जखमी झाले. हल्लेखोरांनी टपरीतील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता. उल्हास पाटील यांनी विरोध करून हल्लेखोरांवर प्रतिकार करीत हल्लेखोरांवर वार केला. यावेळी हल्लेखोरांनी फायरिंग केले. यात गोळी छातीत लागल्याने उल्हास पाटील हे जखमी झाले. याप्रकरणात पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले. हे तिन्ही संशयीत अल्पवयीन आहे. यातील एक शाळेत शिक्षण घेत आहे.



पसार संशयीताचा कसून शोध
पोलिसांनी शहरातील भारतनगर, मोरेश्वरनगर व मुस्लिम कॉलनी परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेतले त्यांना बाल न्याय मंडळापुढे उभे केले असता, तिन्ही जणांना बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नशिराबाद येथील संशयीत पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे भुसावळचे डीवायएसपी संदीप गावीत, शहर निरीक्षक उध्दव डमाळे यांनी सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !