भुसावळात धाडसी घरफोडी : 88 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary in Bhusawal: Valuables worth 88,000 rupees stolen भुसावळ (20 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील जुना सतारा भागातील राम मंदिराजवळील रहिवासी महेंद्र पाटील हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून 87 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील जुना सातारा, राम मंदिर भागातील रहिवासी महेंद्र शरद पाटील (52) हे बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटातून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकला. यावेळी कपाटातून 50 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन, 25 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, 12 हजार पाचशे रुपये किंमतीची पाच ग्रॅमची अंगठी मिळून एकूण 87 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लांबवण्यात आले. दरम्यान, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे आजचे बाजारमूल्य सुमारे साडेचार लाख रुपये आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद करीत आहेत.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !