भुसावळसह राज्यभरातील पालिकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार ! : मंत्री संजय सावकारे


The BJP will come to power in municipalities across the state, including Bhusawal !: Minister Sanjay Savkare भुसावळ (20 डिसेंबर 2025) : भुसावळसह वरणगावच नव्हे तर राज्यभरातील पालिकांमध्ये भाजपाची निर्विवाद सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शनिवारी व्यक्त केला. शहरातील 11 ‘ब’ व 4 ‘ब’ च्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात भाजपाची लाट येणार : मंत्री सावकारे
भुसावळातीलप्रभाग 11 व 4 ‘ब’ ची निवडणूक उमेदवार अपिलात गेल्यानंतर शनिवार, 20 रोजी झाली. यावेळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोलताना मंत्री सावकारे म्हणाले की, रविवारी निकाल जाहीर होणार असलातरी आम्हाला भुसावळातील विजयाची पूर्ण खाी आहे शिवाय वरणगावसह राज्यात भाजपची लाट आहे आणि कमळ निश्चित उमलेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


पक्ष हित पाहून जवाबदार्‍यांचे वाटप
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘जळगाव प्रभारी’ आणि ‘जळगाव निवडणूक प्रमुख’ या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर सावकारे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या जबाबदार्‍या पूर्णपणे वेगळ्या असतात. मी स्वतः नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी जिल्हा प्रभारी होतो. नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जळगावसाठी मंगेश चव्हाण आणि रावेरसाठी नंदू महाजन हे निवडणूक प्रमुख होते त्यामुळे कोणताही वाद असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षहित लक्षात घेऊनच जबाबदार्‍यांचे वाटप केले जाते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !