रावेर नगराध्यक्षपदी भाजपाच्या संगीता महाजन


Sangeeta Mahajan of BJP elected as the mayor of Raver रावेर (21 डिसेंबर 2025) : रावेर पालिकेच्या अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन (14 हजार 93 मते) विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र पवार (सात हजार 618) यांचा सहा हजार 475 मतांनी पराभव केला.

भाजपाला नऊ जागांवर यश
पालिकेच्या 23 नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबरला मतदान झाले होते. भाजपची प्रभाग दोनमधील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. पक्ष चिन्हावर लढलेल्या भाजपला 9 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. संगीता महाजन यांच्या विजयामुळे रावेर नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवला आहे.

निकालानंतर उमेदवार व समर्थकांचा जल्लोष
रविवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी.ए.कापसे, परीवेक्षाधीन तहसीलदार दीपा जेधे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली.

निवडणूक निकाल ऐकण्यासाठी गर्दी
निवडणूक निकाल ऐकण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने जुना सावदा रोडच्या कॉर्नरपासून तहसील कार्यालयाकडे जाणारा एकेरी रस्ता बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद केला होता. निकाल ऐकण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता भास्कर महाजन यांना 14 हजार 93 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांच्या पेक्षा त्यांना सहा हजार 475 मते अधिक मिळाली आहेत. मनीषा पवार यांना सात हजार 618 मते मिळाली आहेत.

प्रभाग निहाय विजयी उमेदवार व मते अशी

प्रभाग 1 अ : नितीन भगवान महाजन (1584) अपक्ष
प्रभाग 1 ब : सपना योगेश महाजन (1515) भाजप

प्रभाग 2 अ : राजेश सुधाकर शिंदे (1383) भाजप
प्रभाग 2 ब : जयश्री नितीन महाजन (बिनविरोध) भाजप

प्रभाग 3 अ : अरुण दत्तात्रय आस्वार (1061) भाजप
प्रभाग 3 ब ः योगीता भूषण महाजन (1457) भाजप

प्रभाग 4 अ : अर्चना योगेश पाटील (1411) भाजप
प्रभाग 4 ब : गणेश प्रभाकर पाटील (1382) भाजप

प्रभाग 5 अ : नरेंद्र विश्वनाथ वाघ (722) राष्ट्रवादी
प्रभाग 5 ब : सालेहा कौसर अल्ताफ खान (900) राष्ट्रवादी

प्रभाग 6 अ : सुमय्या बी.जाविद (2268) राष्ट्रवादी
प्रभाग 6 ब : आसिफ मोहम्मद दारा मोहंमद (2118) राष्ट्रवादी

प्रभाग 7 अ : सानिया परवीन शेख सौऊद (769) राष्ट्रवादी
प्रभाग 7 ब : मोहम्मद समी मोहम्मद आसीफ (822) राष्ट्रवादी

प्रभाग 8 अ : रुबीनाबी इरफान शेख (731) राष्ट्रवादी
प्रभाग 8 ब : शेख सादिक अब्दुल नबी (831) राष्ट्रवादी

प्रभाग 9 अ : शाहीन परवीन सफदार (848) काँग्रेस
प्रभाग 9 ब ः दारा मोहंमद जाफर मोहंमद (753) राष्ट्रवादी

प्रभाग 10 अ : अनिता मुरलीधर तायडे (522) काँग्रेस
प्रभाग 10 ब ः गोपाळ रत्नाकर बिरपण (642) राष्ट्रवादी

प्रभाग 11 अ : सीमा आरिफ जमादार (547) भाजप
प्रभाग 11 ब : गणेश सोपान पाटील (622) (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

प्रभाग 12 अ : प्रमिला चुडामन पाटील (1062) अपक्ष
प्रभाग 12 ब ः राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (1348) भाजप



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !