भुसावळातील प्रभाग 25 मध्ये सोनल महाजनांना सलग तिसर्‍यांदा संधी तर डॉ.छाया फालक यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश


In ward 25 of Bhusawal, Sonal Mahajan got the opportunity for the third consecutive time, while Dr. Chhaya Phalak achieved success in her very first attempt. भुसावळ (24 डिसेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भुसावळात भाजपाची लाट आली व 27 नगरसेवक निवडून आले. भुसावळातील प्रभाग क्रमांक 25 अ मधून सोनल रमाकांत महाजन या डॅशिंग नगरसेविका सलग तिसर्‍यांदा निवडून आल्या तर 25 ब मधून भाजपाच्या नवख्या उमेदवार मात्र सामाजिक कार्यासह सदैव मदतीसाठी तत्पर असलेल्या डॉ.छाया मुरलिधर फालक-देशमुख यांना मतदारांना संधी दिली. शहरात मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपाने निवडणुका लढवल्या व भाजपाच्या गतवेळी 25 तर आता 27 जागा निवडून आल्या.

डॅशिंग नगरसेविकेला सलग तिसर्‍यांदा संधी
सोनल रमाकांत महाजन या अत्यंत डॅशिंग नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. सत्ता असो वा विरोधात असो जनसेवेच्या प्रश्नांची त्यांनी जाण असल्याने आतापर्यंत सभागृहात कणखरपणे आपली प्रभावी बाजू मांडून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सलग तिसर्‍यांदा त्या या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत तर यापूर्वी त्यांचे पती बापू महाजन देखील एका वेळेस विजयी झाले आहेत.

भाजपाच्या रमाकांत सोनल महाजन (2995) यांनी या निवडणुकीत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैशाली ज्ञानदेव पाचपांडे (1850) यांचा 1145 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दीपाली विजयकुमार बर्‍हाटे (1237), अपक्ष सोनाली संदीप चौधरी (358) यांचाही पराभव झाला. 123 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

भाजपाच्या नवख्या उमेदवार डॉ.छाया फालक यांनी माजी नगरसेवकाला चारली धूळ
प्रभाग क्रमांक 25 ब मधून भाजपाच्या नवख्या उमेदवार डॉ.छाया मुरलिधर देशमुख-फालक (2719) या विजयी झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी या भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार व माजी नगरसेवक व माजी आमदार संतोष चौधरी समर्थक दुर्गेश नारायण ठाकूर (2483) यांचा 236 मतांनी पराभव केला. त्या शिवाय बुटासिंग रामसिंह चितोडीया (1147), अपक्ष प्रमोद वसंत पाटील (80) यांचाही पराभव केला. नोटाचा वापर 123 मतदारांनी केला. डॉ.फालक यांच्या विजयासाठी भाजपा पदाधिकार्‍यांसह नगरसेवक पिंटू ठाकूर, उमेदवाराचे पती रुपेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !